Home क्राईम भादली बुद्रुक येथील शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

भादली बुद्रुक येथील शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

0
34

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बुद्रुक येथील शेतकऱ्याची घरासमोरून पार्किंगला लावलेले दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भादली बुद्रुक येथील विजय ओंकार नारखेडे (वय-५२) हे शेतीचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे दुचाकी (क्रमांक एमएच – १९, बीआर ०५८८) आहे. नेहमीप्रमाणे १५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घरासमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी आढळून आली नाही. विजय नारखेडे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound