जळगाव प्रतिनिधी । कुलर सुरू करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला विजेचा जोराचा धक्का लागल्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भादली खुर्द येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती असी की, तालुक्यातील भादली खुर्द. येथे बुधवारी ३० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झालेला असतांना अशोक हरचंद सोनवणे (वय-४५) हे अर्धा तासाने विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर कुलर चालू करण्यासाठी गेले असता लोखंडी खिडकीला हाताचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका लागला. यात ते जखमी झाले, जखमीवस्थेत जळगाव येथे उपचारासाठी नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात दोन मुली, पतनी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.