Home धर्म-समाज भाजयुमोतर्फे अंतुर्ली येथे रक्तदान शिबिर

भाजयुमोतर्फे अंतुर्ली येथे रक्तदान शिबिर


मुक्ताईनगर : प्रतिनिधी ।  कोरोना रुग्णांसाठी रक्तसाठा व  प्लाझ्मा मुबलक उपलब्ध असावा यासाठी भाजपा व भाजयुमो मुक्ताईनगर यांच्यावतीने अंतुर्ली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते 

खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चाळीस पेक्षा  जास्त   रक्तदात्यांनी   रक्तदान केले प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली येथे खासदार रक्षाताई यांनी भेट दिली व कोविड लसीकरण तसेच आरोग्य सुविधांचा आढावा घेतला .  याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील,  भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नरवेलचे  सरपंच मोहन महाजन, बूथ प्रमुख पंकज पाटील, विलास दुट्टे, सुनिल लाखे, मिलिंद महाजन, संदीप महाजन इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound