भाजयुमोच्या युवतींकडून डॉक्टरांचे रक्षाबंधन

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता युवामोर्चा युवतींतर्फे शहरातल्या डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ यांना राखी बांधून आपला आशिर्वाद सदैव्य तुमच्या सोबत असेल असे अभिवचन दिले. 

 

चेतनदास मेहता मधील डॉ. घोलप , डॉ. रुपाली बेंडाळे , डॉ. अशोक जाधव  व सिव्हिल रुग्णालयात डॉ. सिद्धार्थ चौधरी , स्टाफ कर्मचारी , सफाई कामगार, शिपाई व सगळे सेवेकरी ज्यांनी कोविड काळात आपल्या रुग्णांना सेवा देऊन अतोनात प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात टाकून जीव वाचवणाऱ्या  अश्या डॉक्टरांचा , कर्मचारी व स्टाफ यांना राखी बांधली.  आपला सदैव आशिर्वाद तुमच्या सोबत असेल असं सांगत युवतींनी भावाला राखी बांधत हा सुवर्ण क्षण साजरा केला.  यावेळी भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर युवती प्रमुख अबोली पाटीलसह युवती प्रमुख निकिता महाजन, काजल कोळी युवामोर्चा चिटणीस , दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी, आशा गोयर, शितल पाटील, शालिनी देवासकर, कीर्ती पाटील, स्वाती रेखी, भावना भिरुड, वैशाली वंजर व आदी उपस्थित होत्या. 

 

Protected Content