धरणगाव (प्रतिनिधी) देशातील लॉकडाऊच्या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या मातंग व पांचाळ समाजातील गरीब कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी पालिकेतील भाजपचे गटनेते कैलास माळी यांच्यावतीने आज रेशन वाटपासह जनजागृती करण्यात आली.
कोरोना विषाणुच्या संकटाने देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू शकणार नाही. या परिस्थितीत हातावर पोट असलेल्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अशा गरजवंतांची उपासमार होऊ नये, यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कैलास माळी सर व मित्रपरिवाराच्या वतीने आज रेशन वाटप करण्यात आले. त्यात ३ किलो गहू, २ किलो तांदूळ, अर्धा किलो तूर डाळ, पाव किलो तेल, एक डेटॉल साबण व मास्क एवढे साहित्य होते. यावेळी कोरोना विषाणू संदर्भात माहिती देऊन काय काळजी घ्यावी? हे देखील कैलास माळी यांनी सांगितले. बाहेरून आल्यावर साबणाने हात धुण्यासह गर्दीत न जाता घरातच राहण्याचा सल्ला दिला.