भाजपा सोशल मीडिया व आयटी विभाग कार्यकारणी जाहीर

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची सोशल मीडिया व आयटी विभागाची कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.

 

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे(राजूमामा), खा. रक्षा खडसे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महिला प्रदेश उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी पलांडे, मनपा गटनेते भगत बालानी, सरचिटणीस मधुकर काटे, विशाल त्रिपाठी, हर्षल पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, यांच्या उपस्थितीत कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.

या कार्यक्रम प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब व आ.सुरेश भोळे(राजूमामा) यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्याना शुभेच्छा व मार्गदर्शन केले. सोशल मीडिया आणि आयटी विभाग कार्यकारणीत जिल्हा संयोजक पदी अक्षय चौधरी यांची नियुक्ती झाली असून कार्यकारणी मध्ये जळगाव शहरातील नऊ मंडलाचे सोशल मीडिया संयोजक म्हणून शांताराम गावंडे, बापू ठाकरे, अक्षय जेजुरकर, धीरज वर्मा, उमेश सूर्यवंशी, अमित शिंदे, राजेश्वर जोशी, निलेश घुगे पाटील, गौरव पाटील यांचा समावेश आहे. तसेच मोर्चा, आघाडी, प्रकोष्ट निहाय  संयोजक आणि शक्तीकेंद्र संयोजकांचा समावेश आहे.

 

Protected Content