जळगाव, प्रतिनिधी । अयोध्या येथे काल दि. ५ ऑगस्ट रोजी, भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिराचा पायभरणी सोहळा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानिमित्ताने भाजपा मेहरूण मंडल क्र.८ मध्ये, जेष्ठ नगरसेवक सदाशिराव ढेकळे यांच्या संपर्क कार्यालयात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन, मास्क, लावून आणि सामाजिक अंतर ठेऊन करण्यात आले.
या पूजनासाठी आमदार तथा भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजूमामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जेष्ठ नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, मंडल, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, मंडल सरचिटणीस महादू सोनवणे, मंडल उपाध्यक्ष सुनील पाटील, शक्ती केंद्र प्रमुख रमेश मोर्या, बूथ प्रमुख गणेश निकम, युवराज बोरसे, भला तडवी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.