Home Cities जळगाव भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी प्रल्हाद पाटील

भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी प्रल्हाद पाटील

0
40

जळगाव, प्रतिनिधी ।  भारतीय जनता पार्टीच्या  जिल्हा उपाध्यक्षपदी प्रल्हाद पंडित पाटील यांची जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे.

 

भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी रावेर तालुक्यातील मोरगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद पंडित पाटील यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आज मंगळवार दि. १७ ऑगस्ट रोजी नियुक्ती केली आहे.   नियुक्तीपत्रात पक्ष संघटनेतील विविध जवाबदारी तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच व्यापक अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यवाढीसाठी निश्चित बळ मिळेल अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष आ. भोळे यांनी व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.  प्रल्हाद पाटील यांच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील,  समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राकेश पाटील, नंदुभाऊ महाजन, मधु काटे,  रावसाहेब पाटीलआदींनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिंनदन केले.

 


Protected Content

Play sound