भाजपाच्या सहकार्याने २ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण

पाचोरा, प्रतिनिधी  ।   भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील कृष्णापुरी, बाहेरपुरा व हनुमान नगर या भागात महा लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

कृष्णापुरी येथील लसीकरण केंद्रावर कृष्णापुरी भागासह त्रंबक नगर, गुरुदत्त नगर, शिव कॉलनी, शंभू नगर, कोंडवाडा गल्ली, जळगाव चौफूली, मोढाळा रोड, श्रीराम नगर, श्रीकृष्ण नगर,सिंधी कॉलनी तसेच इतर भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.  बाहेरपुरा येथील केंद्रावर बाहेरपुऱ्यासह, श्रीराम चौक, जवाहर हौसिंग सोसायटी, आठवडे बाजार, माहिजी रोड, भारतीया नगर, संभाजी नगर, गुरुदत्त नगर व देशमुख वाडी हुसेनी चौक, मच्छीबाजार, रसूल नगर या भागातील नागरिकांचे लसीकरण झाले.तसेच हनुमाननगर येथील लसीकरण केंद्रावर शिवाजी नगर, भिम नगर, नागसेन नगर, जनता वसाहत, वाल्मीकि नगर या परिसरातील नागरिकांचे लसीकरण झाले. यावेळी तिघेही लसीकरण केंद्र मिळून तब्बल २ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करून शहरातील दैनंदिन लसीकरणाचा विक्रमी उच्चांक यावेळी नोंदविला गेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने आयोजित या महा लसीकरण शिबिरात भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्या मार्फत दोन दिवस आधीच टोकन वाटप करण्यात आले होते. तसेच बॅरिकेट लावून महिला व पुरुष यांच्या स्वतंत्र लाईन तयार करण्यात आल्या होत्या.  प्रत्येक लसीकरण केंद्रात महिला व पुरुषांचे स्वतंत्र लसीकरण कक्ष उभारण्यात आले होते.  नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे काळजी या स्वयं सेवकांमार्फत घेण्यात आली होती. त्यामुळे लसीकरणाचा हा उच्चांक गाठणं शक्य झाल्याचे भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले. त्यांनी यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी केलेल्या नियोजन व मेहनतीचे कौतुक देखील केले. तसेच अशा नियोजनबद्ध पद्धतीने झालेले लसीकरणामुळे नागरिकांची होणारी तारांबळ व हाल थांबल्याने नागरिकांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील विशेष सहकार्य मिळाल्याचे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

 

Protected Content