जळगाव राहूल शिरसाळे । भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचा दावा आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
एकनाथराव खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपच्या कोअर समितीची बैठक पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणीक व माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी ते म्हणाले की, भाजपची आजची बैठक ही नियमीत या प्रकारातील असून कार्यकारिणीची निवड करण्यासाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे. याप्रसंगी त्यांना पत्रकारांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आजच्या कोअर समितीच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे यांनी अनुपस्थिती दर्शविल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, रक्षाताई या दिल्ली येथे महत्वाची बैठक असल्याने आज गैरहजर होत्या. त्यांनी याबाबत आधीच अधिकृत परवानगी घेतलेली आहे. दोन दिवसानंतर त्या पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर मराठा आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पायांच्या शर्यतीसारखे असल्याचा टोला त्यांनी मारला.
खालील व्हिडीओत पहा आ. गिरीश महाजन नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/366769087997903/