Home Cities चोपडा भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीत पाटील व सौ.नेवेंना संधी

भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीत पाटील व सौ.नेवेंना संधी


 

चोपडा : प्रतिनिधी । भाजप जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची  घोषणा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केली त्यामध्ये तालुक्यातील गत जिल्हा कार्यकारीणीतील चिटणीस राकेश पाटील (वडगाव बु॥) यांना उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालिका सौ.रंजना नेवे यांची चिटणीसपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सौ.नेवे अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनेत विविध पदावर कार्यरत असून वेगवेगळ्या सामाजिक संघटनेत सातत्याने काम करतात राकेश पाटील तरुण  कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात परिचित  आहेत  त्यांच्या पत्नी ज्योती पाटील जि.प.सभापती आहेत.

 

या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे नाशिक विभाग ओबिसी सेलचे अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल, जेष्ठ नेते शांताराम पाटील, जी. टी. पाटील, चंद्रशेखर पाटील, तिलकचंद शहा, माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, जि. प. सभापती ज्योती पाटील, उज्ज्वला म्हाळके, जि. प. सदस्य गजेंद्र सोनवणे, कृउबा सदस्य धनंजय पाटील, भरत पाटील, माजी राज्य परिषद सदस्य मगन बाविस्कर, माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, नरेंद्र पाटील, मुन्ना शर्मा, रवींद्र मराठे, हनुमंत महाजन, भरत सोनगिरे, देविदास पाटील, सुनिल सोनगिरे, मनोहर बडगुजर, प्रकाश पाटील, तुषार पाठक, भारती क्षिरसागर, रावसाहेब पाटील, डॅा. मनोज सनेर, डॅा.आशिष पाटील,  डॅा.नरेंद्र अग्रवाल, माजी नगरसेवक पप्पू सोनार, हेमंत जोहरी, संजय श्रावगी, गोविंद सैंदाणे, मनिष पारिख, प्रवीण चौधरी, हिंमतराव पाटील, पं.स.सदस्या कल्पना पाटील, दिपक बाविस्कर, कमलबाई चौधरी, किरण पालिवाल, माधुरी अहिरराव, दिपक पाटील, विनायक पाटील, योगराज पाटील, विजय बाविस्कर  आदींनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound