भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे, तर ‘कोरोना व्हायरस’ : अशोक चव्हाण

मुंबई (वृत्तसंस्था) कमलनाथ सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नाही. ऑपरेशन लोटसला खतपाणी घातले जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर भाजपचं हे ‘ऑपरेशन लोटस’ नसून, ‘कोरोना व्हायरस’ आहे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.

 

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार उलथवण्यासाठी भाजपने सत्ताधाऱ्यांचे आठ आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘ऑपरेशन लोटस’ नाही, भाजपचे वर्तन ‘कोरोना व्हायरस’पेक्षाही भयंकर आहे. मला वाटतं ‘ऑपरेशन लोटस’ आता नित्याचाच भाग झालेला आहे. आम्हा सर्वांना याची सवय झालेली आहे. जे-जे पक्ष लोकशाहीला मानणारे आहेत. ते कधीही ‘ऑपरेशन लोटस’ला यशस्वी होऊ देणार नाहीत. देशात लोकशाही मार्गानेच सरकार चालली पाहिजेत, मग ती कोणाचीही असू देत, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content