भाऊच्या उद्यानासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भाऊंच्या उद्यानासमोरून दुचाकी लांब दिल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहीती अशी की, नितीन कुमार हरिश्‍चंद्र वाघोदेकर यांनी त्यांची एम.एच.१९ बी बी ६७७२ या क्रमांकाची दुचाकी ५ मे रोजी भाऊंच्या उद्याना समोर उभी केली होती. काम आटोपून परतल्यावर उद्यानासमोर उभी दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने नितीनकुमार वाघोदेकर यांनी याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.  शुक्रवारदि.  ६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

Protected Content