मुंबई (वृत्तसंस्था) सध्या तरी आमचा तसा काही विचार नाही पण भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असं मी सांगू शकत नाही, असे सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवले. महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून भाजपाकडून केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. तर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही, असे सांगीतले होते. दरम्यान, बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सध्या तरी आमचा तसा काही विचार नाही पण भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असे मी सांगू शकत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.