जळगाव प्रतिनिधी । शहरातील भवानी पेठेतील जमुना मार्केटमधील गाळ्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सव्वा तीन लाखांच्या किंमतीचा कापसाला आग आज सकाळी लागली. याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, हेमराज रामचंद्र चौधरी (वय-५५) रा. अयोध्या नगर, यांचे शहरातील भवानी पेठेतील जमुना मार्केटमध्ये गाळा आहे. त्यांच्या शेतातील कापूस त्यांनी या गाळ्यात भरून ठेवला होता. आज सकाळी गाळ्याच्या बाहेर इमरतीवर इलेक्ट्रीच्या शॉर्टसर्कीटमुळे कापसाला आग लागली होती. महापालिकेच्या पंपाला बोलावून ही आग विझविण्यात आली होती. यात सव्वा तीन लाख रूपये किंमतीचा ६५ क्विंटल कापूस अर्धवट जळाला होता. पहिल्या बंबाच्या पाण्यात पुर्णपणे न विझल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा कापसाने पेट घेतला. पुन्हा महापालिकेचा बंब बोलाविण्यात आले होते. दरम्यान एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी येवून शॉर्टसर्किटच्या वायरी काढून घेतल्या मात्र मला कोणतीही माहिती सांगितली नाही. एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे ही आग लागल्याचा आरोप हेमराज चौधरी यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.