Home क्राईम भवानी पेठेतून भंगार चोरी; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

भवानी पेठेतून भंगार चोरी; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी प्रकाश पुरोहित यांच्या मालकीच्या जुन्या इमारतीचे काम भवानीपेठ येथे सुरु आहे. या बांधकामावरुन आज्ञात चोरट्यांनी सहा हजारांचे भंगार साहित्य लांबवले आहे.

प्रकाश भागचंद पुरेाहित (वय-५७) यांच्या मालकीच्या भावानी पेठेतील जुन्या इमारतीला तोडून तेथे नव्याने बांधकामाला सुरवात झाली आहे. जुन्या इमारतीचे निघालेले साहित्य, खिडक्या दरवाजे एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरक्षीत रित्या सांभाळून ठेवण्यात आले असतांना चोरट्यांनी पत्री शेडचे कूलूप तोडून आतील जळवपास ३०० किलो जुने भंगार, असारीचे तूकडे, ९० किलो शाफ्ट रॉड, २० किलोचे वजनी माप असा एकुण ६ हजार ३०० रुपयांचा माल चोरुन नेल्या प्रकरणी शहर पेालिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound