धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटन घडली होती. याप्रकरणी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील रहिवासी सुनील नारायण पाटील (वय-४२) हे रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाळधी बायपास जवळील वॉशिंग सेंटर समोरून पाय जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून येणारे ट्रॅक्टर क्रमांक ( एमएच १८ पी २८५७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात मंगळवार २७ डिसेंबर रोजी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहे.