भरधाव डंपरने दुचाकीला उडविले; दोन जणांचा मृत्यू

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका चौफुली येथे आज सकाळी झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात खडका चौफुली येथे वरणगाव कडून भरधाव वेगाने डंफर क्रमांक (एम.एच १९ झेड. ३१९२) वरील चालकाने भरधाव वेगात येऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणारी मोटरसायकल क्रमांक (एम.एच २८ ए.एल.६६७१) यावरील चालक चंद्रकांत जगन्नाथ वराडे (वय ६५) व त्यांची सोबत असलेली त्यांची पत्नी संध्या चंद्रकांत वराडे (वय ५०) दोघ रा. तापी लेआऊट चिखली रोड बुलढाणा हे त्यांचे नातेवाईक भुसावळमधील शंकर हरी किनगे यांच्या घरी ३ डिसेंबर २०२० रोजी रात्री मुक्कामी होते. ४ डिसेंबर २०२० रोजी अनिल ज्ञानदेव धांडे रा. गडकरी नगर यांचे घरी हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असतांना खडका चौफुलीजवळ भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी अनिल ज्ञानदेव धांडे रा. गडकरी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक महेंद्र ब्रिजलाल कोळी रा. भोरटेक ता. यावल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत व सपोनि गणेश धुमाळ यांनी भेट दिली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Protected Content