धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळील भोद फाट्याजवळ भरधाव आयशर ट्रकने दांपत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये विवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पारख नगरातील रहिवाशी महादू शिवाजी चव्हाण (वय-४७) हे ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांची पत्नी रोशनी महादू चव्हाण यांच्यासोबत दुचाकी (एमएच 19 बीइ ९५०२) ने जळगाव येथून अमळनेर येथे जात असताना रस्त्यावरील पिंप्री गावाच्या पुढे असलेल्या भोद फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय २५०१) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर बसलेल्या विवाहिता रोशनी चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर महादू चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर आयशर चालक हा गाडी घेऊन पसार झाला होता. या घटनेबाबत शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात आयशर ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील करीत आहे.