भडगाव भाजपा , महिला मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन

 

भडगाव- प्रतिनिधी । टोळी (ता. पारोळा) येथील तरुणीवर अत्याचार करून तीन नराधमांनी तिला विष पाजून घातपात केल्याच्या गुन्ह्याचा निषेध करीत आज भडगाव भारतीय जनता पक्ष व महिला मोर्चाच्या वतीने निवासी नायब तहसिलदार रमेश देवकर यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. नूतन पाटील, रंजना बावीस्कर, साजीदा शेख सईद, बन्सीलाल परदेशी, प्रमोद पाटील, बापू वाघ, मनोहर चौधरी, शुभम सुराणा, किरण शिंपी, डिगंबर पाटील, मनोज पाटील, शेखर पाटील, सुर्यभान वाघ, गोकुळ महाजन, नामदेव मालचे . उपस्थित होते.

आरोपींना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी व तरुणीस आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा. विकृत, क्रूर मानसिकतेवर कायद्याचा वचक नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने होणाऱ्या अत्याचारांमुळे महिला सुरक्षित तरी आहेत का? याकडे महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे निवेदनात नमूद आहे.

Protected Content