भडगाव तालुक्यात २६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महीला होणार विराजमान

 

भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी गुरुवार २८ जानेवारी रोजी सरपंच पदासाठी तहसिलदार तुप्ती धोडमीसे याच्यां अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आरक्षण सोडत काढण्यात आले. पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दुपारी बारा वाजता हे आरक्षण काढण्यात आले.

भडगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ३३ ग्रामपंचायतीसह इतर १६ ग्रामपंचायतीचे ही आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसुचित जातीसाठी पाच, अनुसुचित जमातीसाठी ८ तर नागरीकाचा मागास प्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आरक्षित झाले. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २३ ग्रामपंचायत चे सरपंचपद आरक्षित झाले आहे. आरक्षणानंतर काहीचा हिरमोड झाला तर काहीच्याचेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला.

यातील २५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद महीलांसाठी राखीव करण्यात आले आहे. आर्यन राठोड या सात वर्षीय बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, विस्तार अधिकारी टी.पी.मोरे , अजिंक्य आंधळे आदी उपस्थित होते.

२३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी

तालुक्यातील तब्बल २३ ग्रामपंचायती चे पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यात पथराड, पासर्डी, पळासखेडे, मांडकी, लोण प्र.भ., शिवणी, आडळसे, आचंळगाव, वलवाडी बु, वाक, बोदर्डे, बांबरुड प्र.ऊ., बांबरुड प्र.ब., बात्सर, भट्टगाव, पिंपरखेड, गुढे, निंभोरा, गोंडगाव, कजगाव, कोठली, कनाशी, वाडे यांचा समावेश आहे. नागरीकाचा मागास प्रवर्गासाठी महीदंळे, मळगाव, आमडदे, भातखंडे बु., पिंपळगाव बु., लोण प्र.ऊ., सावदे, पांढरद, वडगाव-नालबंदि, भोरटेक बु., तांदुळवाडी, बाळद खु., बोरनार ग्रामपंचायतीचे आरक्षण निघाले आहे. अनुसुचित जातीसाठी अंजनविहीरे, शिंदि, पिप्रिंहाट, घुसर्डी खु. पिचर्डे गावाचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. अनुसुचित जमातीसाठी अंतुर्ली बु., खेडगाव खु, वरखेड, कोळगाव, जुवार्डी, वडगाव बु., गिरड, वडजी ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे.

दरम्यान भडगाव तालुक्यात तब्बल २६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महीला विराजमान होणार आहेत. दुपारी चार वाजता प्रातांधिकारी राजेंद्र कचरे याच्यां उपस्थीत महीलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसुचित जातीसाठी शिंदि, पिप्रिंहाट, पिचर्डे अनुसुचित जमातीसाठी अंतुर्ली बु., खेडगाव खु., कोळगाव, जुवार्डी, नागरिकचा मागास प्रवर्गातील आमडदे, भातखंडे बु., पिंपळगाव बु., सावदे, वडगाव नालबंदी, भोरटेक बु., बाळद खु. तर सर्वसाधारण प्रवर्गातील बांबरुड प्र.ब, भट्टगाव, गुढे, निंभोरा, कनाशी, पासर्डी, मांडकी,शिवणी, आचंळगाव,वलवाडी बु., बोदर्डे, बांबरुड प्र.ऊ.ग्रामपंचायत महीलासाठी राखीव
निघाले आहे.

Protected Content