भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटीलची रिक्त पदे आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरा अशी मागणी रिपाइं (अ) तर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील पोलीस पाटील यांचे बांबरुड प्र.ऊ., वरखेड, पिंपळगाव, पिंपरखेड, यासह काही गावात पोलीस पाटील नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील त्या गावाचा प्रशासकीय पातळीतील केंद्र बिंदू आहे. पोलीस पाटील नसल्याने प्रशासनातील अधिकारी यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्रासदायक ठरत आहे. याबाबत त्वरित प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबधित विभाग जबाबदार राहील अश्या प्रकारचे निवेदन तहसीलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष एस.डी. खेडकर, पुंडलिक सोनवणे, गुरुदास भालेराव, पितांबर खैरनार, देविदास बाविस्कर, छोटू मोरे, परमेश्वर सूर्यवंशी, सागर पाटील, प्रीतम सोनवणे, धोंडू राखुंडे, राजू फासगे, दिलीप शिरसाठ, भारत धोबी, सदा पाटील, लीलाधर सूर्यवंशी, परशुराम सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.