भडगाव : प्रतिनिधी । शहरातील ३ हजार ६२० अतिक्रमणे आता नियमित होणार असल्याची माहिती आज आमदार किशोर पाटील यांनी दिली
निवडणुकीच्या काळात शहरातील अतिक्रमीत जागेवरील इमला मालकांना ‘ती’ जागा त्याच्यां नावावर करून देऊ असे आश्वासन दिले होते. आज शासनाच्या निर्णयामुळे ते पुर्ण होत असल्याने खुप मोठे समाधान असून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. प्राथमिक टप्प्यात ३ हजार ६२० जणांचे अतिक्रमण नियमीत होणार आहे असे आ. कीशोर पाटील यांनी सांगितले. आ. कीशोर पाटील शिवसेना कार्यालयात आयोजीत पत्रकार परीषदेत बोलत होते.
आ. कीशोर पाटील पुढे म्हणाले की, भडगाव शहरात मोठ्याप्रमाणात अतिक्रमित जागेवर लोक घर बांधून राहत होते. विषेशत: यशवंतनगर भागात हे प्रमाण मोठे होते. अतिक्रमीत जागा नावावर करून देण्याची ब-याच वर्षापासून मागणी होती. शासनाने २०११ पुर्वीचे अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रहीवाशांचा प्रश्न निकाली निघाला आहे. या निर्णयानंतरही संबधित जागेची मोजणी कोणी करायची ती फी कोणी भरावी असा प्रश्न होता. भुमिअभिलेख व नगरपरीषदेच्या वतीने या जागांची मोजणी करण्यात येणार आहे. संबधित मालमत्तेच्या रेडीरेकनरच्या दराच्या दहा टक्के रक्कम भरून हे अतिक्रमण कायम होणार आहे. यात अनुसुचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना सुट आहे असे त्यांनी सांगीतले.
भडगाव शहरातील ३ हजार ६२० लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. यात पठाणवाडात ४०, खालची व वरची पेठ २५३, पेठ भागातील भिल्ल वस्ती २०६, भोईवाडा १५६, सफाई कामगार वस्ती २३, पिंजारीवाडा ४०, महादेव गल्ली व दत्ताआबा शाॅपिंग ५५३, जुने टोणगाव २३७, कराब ५७, वडधे २२३, यशवंतनगर भोईवाडा व माळीवाडा ५०८, यशवंतनगर उर्दू शाळा ३२७, यशवंतनगर भिल्ल वस्ती २८९, यशवंतनगर गौडंवाडा ८३, यशवंतनगर हनुमान मंदिर ५८४, यशवंतनगर २२४ अतिक्रमीत मालमत्ता नियमित होणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी सांगीतले. सर्वेक्षणा दरम्यान ही संख्या वाढू ही शकते असेही त्यांनी सांगीतले. येत्या ८ दिवसात नगर परीषद व भुमिअभिलेख कार्यालय असे संयुक्तीक जागा मोजणीचे कामास सुरु होणार आहे.
दरम्यान भडगाव शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प, गिरणा नदिवर केटीवेअरसह पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. तर गिरणा नदिवरील पेठ ते जुने मटन मार्केट दरम्यानचा पुलाच्या च्या कामाची मंजुरी या आठवडाभरात मिळेल असे त्यांनी सांगतीले. आम्ही केलेल्या पाठपुराव्याच्या कामाचे कोणीही श्रेय घेऊ नये असे त्यांनी सुनावले.
यावेळी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख गणेश परदेशी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, शहर प्रमुख योगेश गंजे, सहकार आघाडीचे प्रमुख युवराज पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक नागेश वाघ, संजय पाटील, माजी नगरसेवक डाॅ. प्रमोद पाटील, शहर संघटक तुषार भोसले, जग्गु भोई, माजी शिवसेना तालुका प्रमुख जे. के. पाटील, माजी शहर प्रमुख मनोहर चौधरी, देवा आहिरे, निलेश पाटील, रवि सोनवणे, राजु आचारी आदि हजर होते.