जळगाव प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या भजे गल्लीतील हॉटेल साई गजानन पॅलेस लॉजिंगमध्ये सट्टा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर छापा टाकला असता जुगार खेळतांना कोणी आढळले नाही मात्र एका खोलीत एक तरूणी, एक तरूण आणि महिला आढळून आली. लॉजच्या नावावर कुंटनखाना सुरु असल्याच्या संशयावरुन जिल्हापेठ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
शहरातील बसस्थानक शेजारी गजबजलेल्या भागात हॉटेल साई गजानन पॅलेज, लॉजिंग आहे. या हॉटेलातील तळमजल्यावर असलेल्या खोलीत सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी खात्री करण्यासाठी कर्मचार्याला पाठविले. खात्री केली असता सट्टा खेळत नसल्याने आढळले नाही. मात्र संबंधित हॉटेलातील तळमजल्यावर खोलीत तरुण, तरुणी व एक दोन मुले असलेली महिला मिळून आली. याबाबत पोलीस कर्मचार्याने पोलीस उपअधीक्षकांना प्रकार कळविला. पोलीस उपअधीक्षकांना जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे यांना तपासणी करुन नेमका काय प्रकार आहे, त्याबाबत चौकशीच्या सुचना केल्या. त्यानुसार विलास शेंडे, पोलीस उपनिरिक्षक किशोर पवार, योगेश साबळे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. मिळून आलेल्या तरुण तरुणी व महिलेला ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनीही संबधित घटनास्थळाला भेट देवून सीसीटीव्ही तपासले. यात ताब्यात घेतलेले तरुण, महिला व तरुण संबंधित तळमजल्यावर खोलीत प्रवेश करतांना दिसून येत आहे. हॉटेलला पोलिसांनी कुलूप ठोकले असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे, उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलीस निरिक्षकांकडून चौकशी तसेच कार्यवाही सुुरु होती.
यादरम्यान पोलीस कर्मचार्याने एकास हॉटेल मालकाबाबत विचारणा केली. संबधिताने दुसर्या दिशेने हॉटेल मालक पळाल्याचे सांगून स्वतः पसार झाला. काही वेळाने तपासणीअंती ज्याला विचारणा केली होती तोच हॉटेल मालक असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांना कपाळाला हात लावला. संबंधित हॉटेलात 200 रुपयात लॉजिंगची सोय असल्याचे बोर्ड लावण्यात आले असून ग्राहकांना अंघोळ व शौचालयाासठी बाहेरच्या बाजूने सुविधा आहे. ज्या खोलीत महिला, तरुणी मिळून आली. त्या खोलीत तीन ते चार खोल्या असून त्यांना कुलूप लावलेले होते. तर इतर पंखा सुरु तसेच खोल्यांमध्ये पलंगांवर गाद्या अस्ताव्यस्त पडलेल्या तसेच एका पलंगावर तीन ते चार पेन पडलेले दिसून आले. एक प्लॉस्टिकचा टेबल तसेच खुर्च्याही याठिकाणी मिळून आल्या.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1101050587003966/