जळगाव, प्रतिनिधी । अतिक्रमण झालेल्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालत होते, यातून अनुचित घटना घडल्याचे उघडकीस आले होते. ते रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका यांनी संयुक्त कारवाई करून भजे गल्ली येथील अतिक्रमण आज गुरुवार १७ डिसेंबर रोजी काढले.
या कारवाई अंतर्गत ज्या व्यावसायिकांनी व्यवसाय अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला अथवा रस्त्यावर मांडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशांवर जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली. मनपा प्रशासनाद्वारे काल भजे गल्लीतील व्यावसायिकांना रस्ता वर्दळीसाठी मोकळा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिल्याने आज भजी गल्लीतील रस्ता पूर्णपणे मोकळा झालेला दिसून आला. भविष्यात येथे व्यवसाय करण्याची कुठलीही संधी देण्यात येणार नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा उपायुक्त वाहुळे यांनी दिला.
भजी गल्लीत अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी कचरा गटारीत टाकल्याने गटारी तुंबल्या होत्या. यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. उपायुक्त वाहुळे यांनी ह्या गटारी साफ करून घेतल्या.
भाग-१
https://www.facebook.com/508992935887325/videos/909283489886227
भाग-2
https://www.facebook.com/508992935887325/videos/217399046494958