चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरी वाळू वाहतूक करण्यासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणादणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील तापी नदीतून वाळूची सर्रासपणे चोरटी वाहतूक केली जात आहे. याला पोलीसांकडून आशिर्वाद असल्याने वारंवार समोर येत आहे. या अनुषंगाने अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांकडून चार हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटी वाळू वाहतूक करण्यासाठी ही लाच मागितली होती.
दरम्यान, वाळू वाहतूक करण्यासाठी कोणतीही कारवाई करून नये यासाठी अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी याने पंटरच्या माध्यमातून ४ हजाराची लाच मागितली होती.त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याची सत्यता पडताळणीसाठी जळगावच्या एसीबी पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी सापळा रचून अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी योगेश गोसावी आणि खासगी पंटर चंद्रकांत कोळी यांना पकडले आहे. विशेष म्हणजे अडावद पोलीस ठाण्याच्या आवारातच खासगी पंटरने लाच स्विकारल्याने त्याला जागेवरच ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.