जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेगवेगळ्या चारचाकी वापरत, त्यांच्या नंबर प्लेट बदलावून केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये भरदिवसा घर फोड्या करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवार, २३ मे रोजी पर्दाफाश केला आहे.
सात जणांच्या टोळीपैकी पथकाने चार जणांना अटक केली असून त्याच्याकडून तीन लाखांची रोकड, सोन्या चांदीचे दागिणे व एक गावठी कट्टा, चारचाकी वाहनाच्या एकूण २४ वेगवेगळया क्रमाकांच्या नंबरप्लेट असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सागर लक्ष्मण देवरे मोहाडी ता.जामनेर, आकाश सुभाष निकम, अमोल सुरेश चव्हाण व महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
जळगाव जिल्ह्.यात पाचोरा तसेच जामनेर तालुक्यातील काही संशयित तरुण हे चारचाकीच्या नंबरप्लेट बदलावून वेगवेगळ्या चारचाकी वापरत जळगाव जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये भरदिवसा घरफोड्या करुन रोकड तसेच दागिणे लांबवित असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशायितांचा शोध घेवून कारवाईच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक गणेश वाघमारे, पोलीस उपनिरिक्षक अमोल देवढे, सहाय्यक युनूस शेख, रवी नरवाडे, अनिल जाधव, राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनील दामोदरे, संदीप पाटील, अशरफ शेख, गोरख बागुल, कमलाकर बागुल, जयंत चौधरी, अनिल देशमुख, अक्रम शेख, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, दिपक पाटील, संतोष मायकल, प्रितम पाटील, प्रविण मांडोळे, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहूल बैसाने, परेश महाजन, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, प्रमोद ठाकूर व मोतीलाल चौधरी यांच्या वेगवेगळ्या पथकांनी तपासचक्रे फिरवीत संशयितांना शोधून काढलं, सात जणांच्या टोळीपैकी सागर देवरे , आकाश निकम, अमोल चव्हाण व महेंद्र बोरसे या चार जणांना पथकाने अटक केली आहे. तर जितेंद्र गोकूळ पाटील, अमोल गोकूळ पाटील व पवन ऊर्फ पप्पू सुभाष पाटील सर्व रा. मोहाडी ता जामनेर हे फरार झाले आहेत. दरम्यान अटकेतील संशयितांनी जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात तब्बल ३१ घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. दरम्यान फरार संशयितांचा शोध सुरु असून त्यांना अटक झाल्यास बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.