ब्रेकींग : जळगाव, भुसावळ व अमळनेरातील नो व्हेईकल झोन रद्द

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिका हद्द तसेच भुसावळ व अमळनेर पालिका हद्दीतील नो व्हेईकल झोन सोमवार २७ जुलैपासून रद्द करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे. यामुळे पत्रे बंद रस्ते मोकळा श्‍वास घेणार आहेत.

जिल्ह्यातील जळगाव महापालिका क्षेत्र, भुसावळ व अमळनेर येथे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७ ते १३ जुलै जिल्हाधिकाऱ्यांनी लॉक डाऊन जाहीर केला होता. हा लॉक डाऊन संपल्यानंतर वाहनांची व नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता पाहता १४ जुलैपासून या शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आला होता. आता या शहरांमध्ये नो व्हेईकल झोन सुरु ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना खात्री झाल्याने त्यांनी सोमवार २७ जुलैपासून जळगाव महापालिका हद्द तसेच भुसावळ व अमळनेर पालिका हद्दीतील नो व्हेईकल झोन रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

Protected Content