सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारूती दर्शनासाठी दुचाकीने जाणाऱ्या सावदा येथील दोन सख्ख्या चुलत भावांना अज्ञात वाहनाचे जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी २६ ऑगस्ट रोजी घडली. या अपघात दोन्ही तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. भास्कर कुंभार आणि लखन कुंभार असे मयत झालेल्या तरूणांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारूतीचे प्रसिध्द मंदीर आहे. याठिकाणी दर शनिवारी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आज २६ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शनिवार असल्याचे रावेर तालुक्यातील सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाडा येथे राहणारो भास्कर कुंभार हा त्याचा चुलत भाऊ लखन कुंभार यांच्या सोबत दुचाकीने मारूती दर्शनासाठी गेले.
दरम्यान बहार्डी गावानजीक एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर कुंभार याचा जागीच मृत्यू झाला तर लखन कुंभार हा जखमी झाला. त्याला तातडीने भुसावळ येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे आधार होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.