ब्रेकिंग : रावेर तालुक्यात अनोळखी व्यक्तीचा खून; परिसरात खळबळ

रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निमड्या येथे एका अज्ञात व्यक्तीचा खुन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे.या घटनेमुळे रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 

रावेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की रावेर तालुक्यातील निमड्या या गावात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचे घटना आज सकाळी उघडकीला आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, पोलिस निरिक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे आणि रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अद्यापपर्यंत मयताची कुठलीही ओळख पटलेली नाही.

 

नेमका हा खून कोणी केला व कोणत्या कारणासाठी केला, याबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात रावेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content