ब्राझील चीनकडून कोरोना लस खरेदी करणार नसल्याची घोषणा

रिओ दी जेनेरियो: वृत्तसंस्था । ब्राझीलमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांनी कोरोनासाठी ब्राझील चीनकडून लस खरेदी करणार नसल्याची घोषणा केली आहे. ब्राझीलमध्ये चिनी कंपनी सिनोवॅक लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

काही दिवसांआधीच ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनी लशीकरण मोहिमेसाठी चीनची लस खरेदी करणार असल्याचे म्हटले होते. राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांनी सोशल मीडियावर आपल्या एका समर्थकाच्या प्रश्नाला उत्तर देताना चिनी कंपनीची लस खरेदी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

या समर्थकाने राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांना चिनी लस खरेदी न करण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना बोल्सनारो यांनी सांगितले. येत्या काही दिवसात सविस्तरपणे भूमिका स्पष्ट करण्यात येईल

साओ पाओलेचे राज्यपाल जोओ डोरिया यांनी सांगितले की, जानेवारीत लशीकरण मोहीम सुरू करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत आरोग्य नियामक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. डोरिया यांनी आरोग्य मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर चीनच्या सिनोवॅक लशीचे ४६ दशलक्ष डोस खरेदी करण्यावर सहमती दर्शवली होती. ब्राझील सरकारने याआधीच एस्ट्राजेनका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असलेली लस खरेदी करण्यासाठी तयारी केली आहे.

. ब्यूटनेटन इन्स्टिट्यूटचे महासंचालक डिमास कोवास यांनी सांगितले की करोनावॅक (CoronaVac)लशीची चाचणी संपूर्ण १३ हजार स्वयंसेवकांवर केली जात नाही. तोपर्यंत लस प्रभावी असल्यासंबंधीचा डेटा जाहीर करता येणार नाही.

Protected Content