बोहर्डी येथे दोन तलवारी जप्त; तरूणाला अटक

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बोहर्डी येथील तरूणाकडून दोन तलवारी वरणगाव पोलीसांनी जप्त केले असून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र उत्तम कोळी (वय-३३) रा. बोहर्डी ता. भुसावळ या तरूणाकडे बेकायदेशीर रित्या दोन तलवारी असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसुळे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार नरसिंग चव्हाण आणि पोलीस नाईक पराग दुसाने यांनी कारवाई करत जितेंद्र कोळी यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या चाऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ दोन तलवारी आढून आल्यात. संशयित आरोपी जितेंद्र कोळी याला अटक केली असून दोन्ही तलवारी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पो.ना. पराग दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content