बोदवड, प्रतिनिधी । येथे भाजपचे पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांनी सीसीआय खरेदी सुरु करण्याची मागणी तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनाचा आशय असा की, बोदवड तालुक्यामध्ये शासकीय कापूस खरेदीचे (सीसीआय) चे एकच केंद्र असून सदरच्या केंद्रामध्ये कापूस खरेदि ही बऱ्याच दिवसापासून बंद आहे. कोरोना या आजारामुळे खाजगी बाजारपेठेमध्ये कमी भावाने कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे समस्त तालुक्यातील शेतकरी हे वारंवार सभापती किशोर गायकवाड यांच्याकडे तक्रारी करीत आहे. बरेचश्या शेतकऱ्याच्या घरामध्ये अद्यापपर्यंत बऱ्याच प्रमाणामध्ये कापूस पडून असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. तालुक्यातील कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावे असे आशयाचे निवेदन पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांनी दिले आहे. याप्रसंगी भाजपा बोदवड तालुका अध्यक्ष विनोद कोळी, शहराध्यक्ष किरण वंजारी, भागवत टीकारे, सचिन राजपूत हे उपस्थित होते.