बोदवड प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून येथील मरीमाता महापूजा व भंडाऱ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जागृत मरीमाता शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे.
शासनाच्या नियमानुसार फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचे लावून मंदिराचे पुजारी व संस्थापक देविदा राखोंड व सभासद यांच्याहस्ते पूजा व आरती करण्यात येणार आहे. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करता सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्यात करण्यात येणारी मरीमाता महापूजा व भंडारा यावर्षी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जागृत मरीमाता शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट बोदवड यांचेकडून करण्यात येत आहे.