बोदवड प्रतिनिधी । आजवर कोरोनाचा संसर्ग थोपवून धरलेल्या बोदवडमध्ये या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या संख्येने वाढत असल्याने येथील बुधवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
बोदवड शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. यानंतर आज पुन्हा सहा रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमिवर ; कोरोनाची साखळी तुटावी याकरिता आमदार चंद्रकांत पाटिल यांच्याकडून बोदवड शहर बंदचे सलग आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात तहसिलदार हेमंत पाटिल साहेब यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने दिनांक १०, ११ व १२ हे तिन दिवस बोदवड शहर बंद राहणार आहे. यांत मेडिकल, दवाखाने , कृषीकेंद्र व दूध डेअरी वगळता बाकी सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन या जनता कर्फ्यूला सहकार्य करावे असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.