बोदवड प्रतिनिधी । बोदवड न्यायालयात न्या. एच.डी. गरड यांची बदली झाल्याने १७ जुलैपासून बोदवड न्यायालय रिक्त होते. याबाबत नविन न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ॲड. अर्जून पाटील यांनी केली होती. अखेर अडीच महिन्यानंतर बोदवड न्यायालयात न्या. के. एस. खंडारे यांनी पदभार घेतला आहे.
बोदवड न्यायालयात के एस खंडारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निर्णयाचे स्वागत वकील संघाकडून पेढे वाटून करण्यात आले. त्यांची नियुक्ती माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे यांचे पत्रानुसार व जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार ऑक्टोंबर 1 ते 15 ऑक्टोंबर पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. वकील व पक्षकार यांच्या समस्या तसेच न्यायदानात होणारा विलंब या सर्व बाबी चा विचार करून जिल्हा न्यायाधीश यांनी बोदवड येथे भुसावळ येथील न्यायाधीश के. एस. खंडारे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आज न्यायाधीश के.एस. खंडारे यांनी आज पदभार स्वीकारला व त्वरित कामकाजाला सुरुवात केली.
त्यामुळे गेल्या अडीच महिन्यापासून बोदवड येथे न्यायाधीशांची असलेली प्रतीक्षा संपली व पुनश्च पक्षकारांच्या पुकारणे सुरु झाले आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष धनराज प्रजापती , ॲड. विकास शर्मा ऍड अमोल परदेसी ऍड श्रीमती मीनल अग्रवाल ऍड ईश्वर पाटील ऍड किशोर पाटील एडवोकेट के स इंगळे ॲड सी के पाटील हे उपस्थित होते तर कोर्ट अधीक्षक आठवले नाना, भिका सोनवणे, शैलेश पसारे, पोलीस कर्मचारी एस.डी महाजन, महिला पोलीस कर्मचारी डांगे हे उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड तालुका बद्दल संघ व न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.