Home Cities बोदवड बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत खडसेंना धक्का; सत्ता महायुतीकडे, जयपाल बोदडे सभापती...

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत खडसेंना धक्का; सत्ता महायुतीकडे, जयपाल बोदडे सभापती !

0
41

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड राजकीय घडामोडी घडून आ. एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी महायुतीची वाट धरल्यामुळे येथे सत्तांतर झाले असून सभापतीपदी माजी जिल्हा परिषद सभापती जयपाल बोदडे यांनी निवड करण्यात आली आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्या खेळीमुळे खडसेंना जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे.

एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी दणदणीत विजय संपादन करत १८ पैकी १६ जागा पटकावल्या होत्या. अलीकडच्या काळात यातील काही संचालकांनी वेळी वाट निवडत थेट ते सहलीवर रवाना झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर आज बाजार समितीत अखेर सत्तांतर झाले आहे. यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयपाल बोदडे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

या सत्तांतराच्या माध्यमातून आ. चंद्रकांत पाटील यांनी ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या मदतीने एकनाथराव खडसे यांना जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे. विशेष करून तब्बल २५ वर्षांपासून ही बाजार समिती खडसे यांच्या ताब्यात असल्याने आता आ. पाटील यांनी हे सत्ताकेंद्र देखील ताब्यात घेतले आहे. दरम्यान, निवड जाहीर होताच आमदार नंदकिशोर महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


Protected Content

Play sound