Home Cities बोदवड बोदवडमध्ये तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बोदवडमध्ये तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
29

बोदवड प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शहरातून ६९ मीटर लांबीच्या तिरंग्याची पदयात्रा काढली. याला बोदवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी दीपक पाटील, प्रमोद कराड, नितीन झाल्टे, अरविंद चौधरी, अजय पाटील, प्रमोद सोनवणे, विशाल माळी यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. बोदवड महाविद्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा गांधी चौकात आल्यावर जाहीर सभा झाली. येथे विशाल माळी यांनी प्रास्ताविक, तर अभाविपविषयी प्रमोद सोनवणे यांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रमोद कराड यांनी देशभरात अनेक ठिकाणी तिरंगा पदयात्रा काढल्याचे सांगितले. सूत्रसंचालन दर्शना वर्मा, तर आभार स्वप्नील वंजारी यांनी मानले. या पदयात्रेत शहरवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound