Home क्राईम बोडवडचे नगरसेवक सुनील बोरसे यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

बोडवडचे नगरसेवक सुनील बोरसे यांनी घडविले माणुसकीचे दर्शन


बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगणा गावाजवळून मुक्ताईनगर रस्त्यावर 56 वर्षीय व्यक्तीच्या दुचाकीला अपघात झाला. जखमीवस्थेत येथील नगरसेवक सुनील बोरसे यांनी आपल्या गाडीत टाकून त्यांच्यावर प्राथमोपचार केले. त्यांच्या या कार्याने परीसरातून कौतूक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, ने जळगावच्या मेहरूण येथील अरुण हरी पिसे (वय 56) यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यात त्यांचा पाय तुटल्याने ते तब्बल अर्धा तास जखमी अवस्थेत तिचेच पडून होते. दरम्यान नगरसेवक सुनील बोरसे मुक्ताईनगर येथून बोदवडकडे येत असताना त्यांना जखमी व्यक्ती जखमी अवस्थेत निदर्शनास आल्याने नगरसेवकांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीत टाकून बोदवड ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमी व्यक्तीवर प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगावला 108 ला फोन करून त्या गाडीतून रवाना केले. जखमी अवस्थेत असलेले अरुण पिसे यांनी जखमीच्या कुटुंबियांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. सुनील बोरसे यांच्याशी बोलायला लावले असता पिसे यांच्या कुटुंबातील नातेवाईकांडून आभार मानले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound