जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या मालमत्ता तसेच रस्त्यावर बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा गठीत करण्यासाठी मनपाला उच्च न्यायालयाने सूचना दिल्या आहेत.
शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृतपणे बेवारस वाहन पडून असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. अशा बेवारस वाहनांबाबत नागरिकांसाठी तक्रार निवारण यंत्रणा गठीत करण्याचे पत्र मनपा स्थायी समितीच्या सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी आयुक्तांना दिले आहे. संबंधित विभागांना याबाबत सूचना देण्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.