बेरोजगारीचा कंटाळून तरुणाची आत्महत्या

 

रावेर  : प्रतिनिधी ।  रावेर शहरात बेरोजगारीला कंटाळुन एका तिस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

रावेर शहरातील रहीवासी प्रमोद जगन्नाथ महाजन (वय ३०) याने  मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रमोद विवाहीत होता. त्याला एक वर्षाचा मुलगा देखील आहे.या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.प्रमोद हा काही दिवसांपासुन काम नसल्याने त्रस्त होता असे मयत प्रमोद यांचे मोठे बंधु गणेश महाजन यांनी सांगितले  रावेर पोलिसात अकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली  पुढील तपास पोलिस करत आहे.

 

Protected Content