Breaking : अमळनेरात बर्निग कारचा थरार

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासगी चारचाकी कारमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत असतांना अचानक लागलेल्या आगीत चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना शहरातील बसस्थानकाच्या बाजूला घडली.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बसस्थानकाच्या बाजूला जुनी पोलीस लाईन जवळ व चोपडा रस्त्याच्या बाजूस वाहने दुरूस्ती करण्याचे दुकाने आहेत. याठिकाणी दुरूस्तीच्या कामांसह चारचाकी वाहनांमध्ये विना परिवाना गॅस कीट बसविण्याचे काम सुरू असते. अश्याच पध्दतीने मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपाच्या सुमारास (वेळ नक्की माहित नाही) एका ओम्नी या चार चाकी वाहनात बसविलेल्या गॅसकीटच्या माध्यमातून गॅस भरण्याचे काम सुरू असतांना अचानक गॅस गळतीने पेट घेतला. काही कळण्याच्या आता उभी कारने पेट घेतली. यात आगीत संपुर्ण कार जळून खाक झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अ,अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे  आग विझविण्यात आली आहे. तसेच शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content