जळगाव प्रतिनिधी । शहरातील आर.एल. चौफुलीवर बेकायदेशीर विदेशी दारू विक्री करणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातील ३ हजार ६४० रूपयांची विदेशी दारू हस्तगत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील आर.एल.चौफुलीवरील हॉटेल सागरच्या पाठीमागे संशयित आरोपी सागर नारायण सोनवणे (वय-२२) रा. सुप्रिम कॉलनी हा बेकायदेशीर विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश लोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने विदेशी दारू विक्री करतांना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातील ३ हजार ६४० रूपये किंमतीच्या आयबी कंपनीच्या १८० एमएलच्या २६ बाटल्या हस्तगत केल्या आहे. पो.कॉ. गाविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून सागर सोनवणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोका निलेश पाटील, असिम तडवी, इम्रान सैय्यद यांनी कारवाई केली.