जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशीर गावठी हातभट्टीची तयार दारू दुचाकीने नेत असतांना एकाला रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातील २ हजार रूपये किंमतीची दारू आणि मोटारसायकल हस्तगत केली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी दशरथ वजीर माचरे (वय-३५) रा. कंजरवाडा हा दुचाकी क्रमांकउ (एमएच १९ बीसी ८१७८) वर प्लास्टीकच्या ४० लिटर कॅनमध्ये ३५ लिटर तयार गावठी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.ना. नितीन पाटील, पोकॉ चंद्रकांत पाटील, गोविंदा पाटील, पोकॉ हेमंत कळसकर यांच्या पथकासह संशयित आरोपी दशरथ माचरे यांला दुपारी १२ वाजता मेहरूण खदाणीजवळून दुचाकीने जात असतांना कॅनमध्ये काय आहे असे विचारल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली व पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी पाठलाग करून त्याला पकडून अधिक माहिती घेतली असता ४० लिटर कॅनमध्ये ३५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू आढळून आली.
संशयित आरोपी दशरथ मारचे यांच्या ताब्यातील दुचाकी आणि तयार गावठी दारू असा एकुण ५२ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोका ईमरान अली युनूस अली सय्यद यांच्या फिर्यादीवरून विरोधात एमआयडीसी पोलीसात दारूबंदी अधिनियम कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.