भुसावळ प्रतिनिधी । साकेगाव रोडवर दुचाकीवरून बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बेकायदेशील गावठी दारू विक्री करणाऱ्या दोघांवर भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील साकेगाव सिगरबर्डी भागात सुपडू सोमा भोई रा. भाईनगर भुसावळ हा दुचाकीवर बेकायदेशीर ३० लिटर देशी गावठी हातभट्टी तयार दारू घेवून जात असतांना भुसावळ तालुका पोलीसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातील २७ हजार ५०० रूपये किंमतीचा दुचाकी व गावठी दारू असा मुद्देमाल जप्त केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत इसम जयसिंग किसन इंगळे रा. मिरगव्हाण ता.भुसावळ हा संशयित बेकायदेशीर गावात संचारबंदी काळात गावठी दारूची विक्री करत असतांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ५ हजार ४०० रूपये किंमतीचे ६० लीटर तयार दारू हस्तगत केली.
यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, स.फौ. सुनील चौधरी, पोहेकॉ विठ्ठल फुसे पोहेकॉ संजू मोंढे, विजय पोहेकर, जगदीश भोई, होमगार्ड सोकोकारे यांनी केली.