Home क्राईम बेंडाळे चौकातून तरूणाची दुचाकी लांबविली

बेंडाळे चौकातून तरूणाची दुचाकी लांबविली

0
19

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील बेंडाळे चौकातील झाशीची राणी पुतळ्याजवळून आसोदा येथील तरूणाची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, मंगल शालिक बिऱ्हाडे (वय-३२, रा. आंबेडकर नगर, असोदा ता.जि. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मंगल बिऱ्हाडे हा दुचाकी (एमएच १९ डीक्यू ३८२९)ने  जळगाव शहरात असलेल्या बेंडाळे चौकातील झाशीची राणी पुतळ्याजवळ कामावर आला. त्यावेळी त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. रात्री १०.३० वाजता काम आटोपून घरी जाण्यास निघाला असता त्याला त्याची दुचाकी जागेवर मिळाली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound