जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील देशी दारूच्या दुकानासमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, सागर अशोक राऊत (वय-२८) रा. गणपती मंदिर जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरीकरून आपला उदरनिर्वाह करतो. २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सागर हा जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील देशी दारूच्या दुकानाजवळ कामानिमित्त आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकानाच्या बाजूला दुचाकी पार्क करून लावली. काम आटोपून आल्यानंतर सागर याला जागेवर दुचाकी दिसून आली नाही. त्याने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी ६ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.