बी.यू.एन. रायसोनीअन्सचा ‘युफोरिआ ‘जल्लोषात

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सी.बी.एस.ई पॅटर्न) प्रेमनगर यांच्या १० व्या युफोरिअा स्नेहसंमेलन संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ येथे जल्लोषात साजरे करण्यात आले.

यावेळी बाल कलाकारांनी नूत्यासह विविध कलागुण सादर केले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा ग्लिटरींग स्टार ट्रॉफी व प्रथम क्रंमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रँकर ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. कोरोना काळानंतर दोन ते तीन वर्षानंतर रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासर्व चिमुकल्या रायसोनीअन्सचे उत्साह वाढविण्यासाठी शाळेकडून विविध कार्यक्रम घेतले.

याप्रंसगी शिवाजी महाराज – अफजल खान भेट, कोरोना, पालक-शिक्षक व विद्यार्थी यांच्या संबधावर नाटीका सादर करण्यात आली. सोबत उत्साह व जल्लोष दाखविणारे व प्रजीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करुन आनंदाने जगा शिकविणारे नृत्य, गायन सादर करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल.केजी ते ७ वी च्या एकूण १५ चिमुकल्यांनी न घाबरता केले. याचे सर्वांनी आश्चर्य या प्रसंगी व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमात ९० टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. याचे विशेष कौतूक संस्थेच्या पदाधिकारी शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी केले.

‘कागद वाचवा’ अभियानाचे अवलंब

कागद वाचवा, झाडे वाचवा, देश वाचवा अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची पत्रिका सर्वांना व्हाट्सॲपद्वारा पाठवून कागद वाचवा , झाडे वाचवा व देश वाचवा या ब्रिद वाक्याचे अनुकरण करण्यात आले. यासर्व पालक- शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य व सर्व पालकांनी या शाळेच्या उपक्रमाची स्तूती केली.

 

Protected Content