Home क्राईम बी.जे.मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

बी.जे.मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

two wheelar thift


जळगाव प्रतिनिधी । शहराती बी.जे. मार्केट परिसराती वाणी मंगल कार्यालयाजवळून व्यावसायिकाची २० हजार रुपये किंमतीची मोपेड दुचाकी लांबविल्याची घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, शिरसोली रोडवरील लेक व्हू रेसिडेन्सी येथे संकेत संजय मुंदडा (वय-२८) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. बी.जे. मार्केट परिसरातील वाणी मंगल कार्यालयाजवळ मुंदडा यांचे दुकान आहे. १७ रोजी नेहमीप्रमाणे ते दुकानावर आले.  वाणी मंगल कार्यालयाच्या मागे मुंदडा यांनी त्यांची मोपेड दुचाकी (एमएच १९ सीएस ३९०४) ही उभी केली होती. काम आटोपून परतले सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास परतले असता, त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न मिळून आल्याने मुंदडा २२ रेाजी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन २० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविणार्‍या अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्‍वर सपकाळे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound