जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद येथील भवानी नगरात बीएसएनएन ऑफिसमधून चोरट्यांनी तब्बल ४२ मीटर लांबीची ४२ हजार रुपये किंमतीची केबलवायर चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नशीराबाद येथील भवानी नगरात बीएसएनएल ऑफिसमध्ये तब्बल ४२ मीटर केबलची वायर ठेवलेली होती, ही केबलची वायर चोरुन नेल्याचा प्रकार शनिवार, १ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. टेलीफोन मॅकेनिकल मोहन गोविंदा भारंबे वय ६० यांनी हा प्रकार फोनवरुन त्यांच्या वरिष्ठांना कळविला, व त्याच्या सुचनेनुसार याप्रकरणी सायंकाळी साडेपाच वाजता नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेब राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.बीएसएनएल कार्यालयातून केबल वायरची चोरी
नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद येथील भवानी नगरात बीएसएनएन ऑफिसमधून चोरट्यांनी तब्बल ४२ मीटर लांबीची ४२ हजार रुपये किंमतीची केबलवायर चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नशीराबाद येथील भवानी नगरात बीएसएनएल ऑफिसमध्ये तब्बल ४२ मीटर केबलची वायर ठेवलेली होती, ही केबलची वायर चोरुन नेल्याचा प्रकार शनिवार, १ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. टेलीफोन मॅकेनिकल मोहन गोविंदा भारंबे वय ६० यांनी हा प्रकार फोनवरुन त्यांच्या वरिष्ठांना कळविला, व त्याच्या सुचनेनुसार याप्रकरणी सायंकाळी साडेपाच वाजता नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेब राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.